शुक्रवार, डिसेंबर 2, 2022

Hinjawadi : हिंजवडी पोलिसांनी रिक्षा चालकांना लुटणाऱ्या टोळीला केली अटक

एमपीसी न्यूज : पिस्टलचा धाक दाखवून (Hinjawadi) रिक्षा चालकांना जबरदस्तीने लुटणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी अटक केले आहे. संभाजी जाधव (वय 34 वर्षे, रा. ओंबाळेवाडा), दत्तात्रय बलकवडे (वय 45 वर्षे, रा. दारवली) व सुनील पवार (वय 37 वर्षे रा. माण) या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्याकडून एकूण 1.60 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

12 नोव्हेंबर रोजी टीपटॉप हॉटेल समोर एका इसमास पॅशन मोटरसायकल वरील तीन इसमांनी मारहाण करून जबरदस्तीने त्याच्या खिशातील 4 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात भादवी कलम 394, 34 अन्वये गंभीर गुन्हा दाखल आहे.

Pune Crime : माजी सरपंचाचे घृणास्पद कृत्य; अल्पवयीन मुलीवर बलात्कार

डॉ. काकासाहेब डोळे (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 2 पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड) यांनी हा गुन्हा गंभीर असून तो उघडकीस आणण्याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना सूचना दिल्या होत्या.

तपास पथकातील (Hinjawadi) सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे व राम गोमारे असे तपास पथकातील अंमलदारांसह दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की, मागील महिन्यामध्ये वाकड पोलीस ठाणे व डेक्कन पोलीस ठाणे, पुणे शहर हद्दीत अशीच लाल रंगाची पॅशन मोटर सायकल वापरून खोटे पॅसेंजर बनून रिक्षात बसून रिक्षा चालकाला मुळशी भागातील जंगल परिसरात आणून दमदाटी व शिवीगाळ करून पिस्टलचा धाक दाखवून रिक्षा चालकांकडे असलेले सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व रोख रक्कम जबरदस्तीने चोरी करून नेले असल्याने अनोळखी इसमांच्या विरोधात वाकड पोलीस ठाणे व डेक्कन पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

त्याप्रमाणे वाकड व डेक्कन पोलीस ठाणे येथील गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन तेथील सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज पाहून खात्री केल्यावर व नमूद तिन्ही गुन्हे एकाच मोटरसायकलचा वापर करून केले असल्याचे समजले. त्यानंतर गुन्हे केल्यानंतर आरोपी हे निघून जाण्याच्या मार्गावर असताना पोलिसांनी त्यांना अटक केली.

सदर आरोपींकडून 25 हजार रुपये किंमतीची पॅशन मोटरसायकल, 1.25 लाख रुपये किंमतीच्या 25 ग्राम वजनाच्या दोन सोन्याच्या चैन, दहा हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल फोन, एक एअरगन व लाकडी दांडके असा एकूण 1,61,100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Latest news
Related news