Pune : पुणे शहर तसं चांगलं आहे, फक्त वाहतुकीची समस्या – ख्रिस गेल (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- पुणे शहर तस चांगलं आहे, पण येथे वाहतुकीची समस्या खूप आहे. हॉटेलवरून मैदानावर जाण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागायचा. अशी तक्रार केलीय घणाघाती फलंदाजीसाठी ओळखल्या जाणा-या वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने. त्याने आज पुण्यातील ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाला दुस-यांदा भेट दिली. त्यावेळी त्याने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.

गेल म्हणाला, "आयपीएल ही जगातील सर्वोत्तम क्रिकेट लीग असली तरी भारतीय खेळाडूंनी इतर देशांत होणा-या लीग मध्ये सहभागी व्हायला हवे. यंदाच्या मोसमात आयपीएल कोण जिंकणार असे विचारले असता गेल म्हणाला प्ले ऑफ साठी पात्र ठरलेले सर्वच संघ हे चांगल्या फॉर्मात असल्याने कोणता संघ आयपीएल जिंकेल याचा अंदाज वर्तविणे अशक्य आहे. यंदाच्या आयपीएल मोसमात कित्येक सामान्यांचा निकाल हा सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर लागला अशा प्रकारची चुरस असताना कोण जिंकेल हा अंदाज देणे अत्यंत अशक्य आहे. फुटबॉलपटू रोनाल्डोचा चाहता असलेल्या ख्रिस गेलने रोनाल्डो येत्या फुटबॉल विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करून आपल्या संघाला विश्वचषक जिंकून देईल" असा विश्वास व्यक्त केला

तत्पुर्वी ख्रिस गेलने संग्रहालयात मुलींना बॅट पकडण्याच्या तंत्राविषयी टिप्स दिल्या तसेच त्यांच्या मनातील क्रिकेट विषयक शंकाचे निरसन देखील केले. यावेळी संग्रहालयाचे संस्थापक रोहन पाटे व क्रिकेट शिकणारी काही मुले देखील उपस्थित होती. त्याने त्याच्या यंदाच्या आयपीएल मोसमात शतक झळकावलेली बॅट व किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची जर्सी संग्रहालयाकरिता रोहन पाटे यांच्याकडे आज सुपूर्द केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.