Thergaon : जलपर्णीमुक्त पवनामाई अभियानात पर्यावरण प्रेमीसह सामाजिक संघटनांचाही सहभाग

197 दिवसात 1355 ट्रक जलपर्णी नदीपात्राबाहेर; रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचा अभिनव उपक्रम

एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम’ या अभियानाचा रविवारी (दि. 20) 197 वा दिवस केजुबाई बंधारा थेरगाव बोट क्लब येथे पार पडला. यावेळी विविध सामाजिक आणि पर्यावरण प्रेमी संघटनांच्या 200 सदस्यांनी सहभाग घेतला. रविवारी 5 ट्रक जलपर्णी बाहेर काढण्यात आली. यामुळे आजवर 1355 ट्रक जलपर्णी नदीपात्राबाहेर काढण्यात आली आहे.

दिशा फाउंडेशनचे बाळासाहेब जवळकर, नाना शिवले, संतोष निंबाळकर, सचिन साठे, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे, देश का सच्चा हिरो चंद्रकांत राधाबाई दामोदर कुलकर्णी, क्विन्स टाऊन येथील तरुण आणि नागरिक, इंडो सायकलिस्ट क्लबचे सर्व सायकलिस्ट, प्राज इंडंस्ट्रीज, रोट्रॅक्ट क्लब ऑफ चिंचवड, रानजाई प्रकल्प, स्वामी विवेकानंद केंद्र, अखिल गणेशनगर युवा प्रतिष्ठान थेरगाव, परिवर्तन फाउंडेशन थेरगाव, अविरत फाउंडेशन,कर्तव्य परिवार, पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक रोटरी क्लब, पर्यावरण संवर्धन समिती, पिंपरी-चिचंवड सिटीझन फोरम, एस के एफ कामगार संघटना, पोलीस मित्र मंडळ, एस पी वायर्स आदी संस्था व संघटनांचे पदाधिकारी व सदस्य असे एकूण 200 जणांनी सहभाग नोंदवला. दिशा फाउंडेशनतर्फे 5 हजार रुपयांची मदत करण्यात आली.

मागील 197 दिवसात जलपर्णीमुक्त पवनामाईसाठी केलेले वेगवेगळे उपाय, प्रयत्न, उगम ते संगम पवित्र पवनामाई अभियानाची संकल्पना रोटरीचे अध्यक्ष रो प्रदीप वाल्हेकर आणि सोमनाथ आबा मुसुडगे यांनी विस्तृतपणे सर्व नवीन सहभागी सदस्यांना सांगितली. तसेच भविष्यात केल्या जाणाऱ्या तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी कामाची, योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन रो अॅड. सोमनाथ हरपुडे व रो सचिन काळभोर यांनी केले. येत्या रविवारी (दि. 27) हे अभियानात केजुबाई बंधारा थेरगाव बोट क्लब येथे होणार आहे. शहरातील सर्व नदीप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन रो सुभाष विठोबा वाल्हेकर यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.