Kishor Aware : जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज – (श्याम मालपोटे) तळेगाव येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे (Kishor Aware) यांना दि 29 ऑक्टोबर रोजी एस एम जोशी सभागृह येथे महाराष्ट्र कला प्रसारणी सभा आयोजित डॉ. निर्मलकुमार फडकुले समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दरम्यान, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ.सुधीर रसाळ सर व भारत ससाने यांच्या उपस्थितीत व ज्येष्ठ साहित्यिककुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले यांच्या शुभहस्ते किशोर आवारे यांस समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोरोना काळामध्ये किशोर आवारे यांनी जनसेवा थाळीच्या माध्यमातून केलेली रुग्णसेवा व कोल्हापूर आणि चिपळूण येथील पूरग्रस्तांना केलेली मदत बहुमूल्य ठरली होती. समाजहिताच्या या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

किशोर आवारे यांना अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत (Kishor Aware) असून त्यांच्या निस्वार्थ कार्याच्या जोरावर त्यांचा हा गुणगौरव होत आहे, असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. पुरस्कार प्रदान प्रसंगी त्यांच्या मातोश्री देखील उपस्थित होत्या व त्यांनीही कौतुकाची थाप किशोर आवारे यांना दिली.

Shivsena : 16 वर्षांपासून मनपा कामगारांना दिवाळी फराळ, ड्रायफ्रूट बॉक्स वाटप : पृथ्वीराज सुतार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.