South Korea : दक्षिण कोरियात हॅलोविन उत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत 150 हून अधिक लोकांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : दक्षिण कोरियात (South Korea) हॅलोविन उत्सवादरम्यान शनिवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. राजधानी सेऊलमध्ये हॅलोविन उत्सवासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. प्रचंड गर्दीमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर चेंगराचेंगरीत अनेक लोकांना हृदयविकाराचाही झटका आला.

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलच्या बाजारपेठेत सुरू असलेल्या हॅलोविन पार्टीत एक भितीदायक दृश्य पाहायला मिळाले. जिथे 1 लाख लोकांच्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली होती, त्यानंतर अनेक लोक रस्त्यावर बेशुद्ध पडले होते. मृतांचा आकडा 151 वर पोहोचला आहे, तर 82 हून अधिक लोक जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले. तपासणीत असे आढळून आले, की एकाच वेळी 50 हून अधिक लोकांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर हॅलोविनच्या सेलिब्रेशनचे शोकाकुलात रूपांतर झाले. या प्रकरणाचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये पोलिस कर्मचारी रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या लोकांना सीपीआर देताना दिसत आहेत.

दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, राजधानी सेऊलमध्ये (South Korea) हॅलोविन उत्सवादरम्यान एका अरुंद रस्त्यावर मोठ्या जमावाने त्यांना चिरडल्याने शेकडो लोक जखमी झाले आणि अनेकांचा मृत्यू झाला, अशी भीती वृत्तसंस्थेने व्यक्त केली आहे. नॅशनल फायर एजन्सीचे अधिकारी चोई चेओन-सिक यांनी सांगितले की, शनिवारी रात्री इटावान लीजर जिल्ह्यात गर्दीमुळे सुमारे 82 लोक जखमी झाले आणि सुमारे 50 लोकांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Kishor Aware : जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.