Pune : कोंढवा गोळीबार प्रकरणातील जखमीचा उपचारदरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज – ज्वेलर्सच्या दुकानात भरदिवसा घुसून कामगारावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना काल बुधवारी (दि.21) दुपारी पावणे दोनच्या सुमारास येवलेवाडी येथील गणेश ज्वेलर्स या दुकानात घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या अमृत परिहार (वय 25, रा.मूळगाव राजस्थान) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
असे गोळीबारात मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

येवलेवाडी येथील गणेश ज्वेलर्सचे या दुकानाचे मालक दुकानात नव्हते ते काही कारणांमुळे बाहेरगावी गेले आहेत. त्यांच्या दुकानात अमृत हा गेल्या चार वर्षांपासून कामास असून तो दुकानात एकटाच होता. नेहमीप्रमाणे तो दुकानात आपले काम करत असताना आज अचानक दुपारी चारजण तेथे आले आणि त्यांचे अमृतशी काही बोलणे झाले. दरम्यान चार जणांपैकी तोंडाला बांधलेल्या एकाने बंदूकीतील गोळी अमृतवर झाडली आणि चारही आरोपी तेथून पसार झाले. झालेल्या गोळीबारात अमृतच्या पोटाला गोळी लागल्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अमृतच्या पाठीमागे त्याची पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1