Hadapsar – बेशिस्त ट्रकचालकाच्या चूकीमुळे दुचाकीवरील वृद्धेचा दूर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज –  आसपासच्या वाहनांकडे दुर्लक्ष करून अचानकपणे ट्रक वळविल्यामुळे बेशिस्त ट्रकचालकाच्या चुकीमध्ये दुचाकीवरील वृद्धेचा दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.21) दुपारी बाराच्या सुमारास पुणे-सोलापूर रस्त्यावरील गाडीतळ हडपसर पीएमपीएल बस डेपोच्या समोर घडली.

इंदुबाई जनार्धन फुंदे (वय 65, रा.हडपसर) असे मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपाडे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर रस्यावरील गाडीतळ हडपसर पीएमपीएल बस डेपोच्या समोरील रस्त्यावर एका अज्ञात ट्रकचालकाने त्याचा ट्रक वाहतुकीच्या नियमांकडे दूर्लक्ष करून व आजूबाजूस न पाहता अचानकपणे डाव्या बाजूला वळवला. त्यामुळे तेथून जाणारी मोटारसायकल त्या ट्रकला जाऊन जोरदार धडकली. व त्यामुळे दुचाकीवर मागे बसलेल्या वृद्ध
महिलेचा गंभीररित्या जखमी होऊन दूर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.