Pimpri : पसंती क्रमांकासाठी “आरटीओ’चे आवाहन

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वतीने वाहनांसाठी नवीन मालिका सुरु होत असून, त्यासाठी आकर्षक क्रमांकासाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहे. मोटारीसाठी हव्या असलेल्या राखीव क्रमाकांसाठी तिप्पट शुल्क आकारुन तो क्रमांक लिलाव पद्धतीने देण्यात येईल, अशी माहिती उप परिवहन अधिकारी यांच्या वतीने देण्यात आली.

वाहन चालकांना हवा असलेला पसंतीचा क्रमांक मिळावा यासाठी त्यांनी 26 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी अडीच या वेळेत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड यांच्या प्रति जमा कराव्यात. एकदा राखून ठेवलेला क्रमांक बदलून घेता येणार नाही. तसेच, 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर न केल्यास नोंदणी क्रमांक रद्द होवून शुल्क सरकार जमा होईल, असे परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.