Pune : अपघातांच्या योग्य माहिती संकलनासाठी आरटीओचे पाऊल; वाहन निरीक्षकाच्या नेमणुकीचा निर्णय

एमपीसी न्यूज :  गेल्या काही वर्षांत रस्ते अपघात आणि त्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या सातत्याने वाढत असल्याने या अपघातांची संपूर्ण माहिती संकलित करून ते कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी परिवहन विभागाने नवा निर्णय घेतला आहे. (Pune) प्रत्येक प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हद्दीतील पोलिस ठाण्यांमध्ये एक मोटारवाहन निरीक्षक आणि एक सहायक मोटारवाहन निरीक्षक नेमण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड आणि बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हद्दीतील सुमारे 71 पोलिस ठाण्यांमध्ये मोटारवाहन निरीक्षक आणि सहायक मोटारवाहन निरीक्षकांची नेमणूक केली जाणार आहे.

‘रस्ते सुरक्षा अभियाना’अंतर्गत रस्त्यांवरील अपघात कमी करण्यासाठी परिवहन विभाग विविध उपाययोजना करीत आहे. परिवहन कार्यालयाच्या हद्दीतील महत्त्वाच्या रस्त्यांवर ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईही करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पोलिस ठाण्यांमध्ये एक मोटारवाहन निरीक्षक आणि एक सहायक मोटार वाहन निरीक्षक नेमला जाणार आहे.

Chinchwad News : पारंपारिक लावणी जपली जाईल – सुधीर मुनगंटीवार

पोलिस ठाण्यांच्या हद्दीत होणाऱ्या अपघातांची संख्या, अपघातांतील मृत आणि जखमींची संख्या, अपघातांची कारणे, रस्त्यांची परस्थिती या सर्व गोष्टींची माहिती संकलित करण्याचे आणि (Pune) त्याचे विश्लेषण करण्याचे काम या मोटारवाहक निरीक्षकांकडे दिले जाणार आहे. त्यानंतर या अपघातांचा एक अहवाल तयार करून त्यांना तो परिवहन कार्यालयाला पाठवावा लागणार आहे.

परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार प्रत्येक प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या हद्दीतील पोलिस ठाण्यांत मोटारवाहन निरीक्षक आणि सहायक मोटारवाहन (Pune) निरीक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे. अपघातांची वाढती संख्या कमी करणे, अपघात का होत आहेत, याची नेमकी माहिती संकलित करणे आणि भविष्यात अपघात होऊ नयेत, यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.