Kothurne Case: कोथुर्णे प्रकरणी आरोपीचे वकीलपत्र घेण्यास वकिलांचा नकार, वडगाव मावळ बार असोसिएशनचा ठराव

एमपीसी न्यूज: मावळ तालुक्यातील कोथुर्णे येथील सात वर्षांच्या मुलीचे मंगळवारी (दि. 2) अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. (Kothurne Case) या हृदयद्रावक घटनेनंतर कामशेत पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत अवघ्या 24 तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. या आरोपीचे वकीलपत्र घेण्यास वडगाव-मावळ येथील वकिलांनी नकार दिला असून वडगाव-मावळ बार असोसिएशनने तसा ठराव केला आहे.

 

Kasarwadi Tree Collapsed: कासारवाडी येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतुकीस अडथळा

माणुसकीला काळीमा फासणारे या घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरला आहे. अशा नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसह मावळ तालुका बंदची हाक देण्यात आली होती. 3 ऑगस्ट ला कोथुर्णे  येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचा खून करण्यात आला होता. (Kothurne Case) वडगाव मावळ बार असोसिएशनने त्या मुलीच्या वडिलांना पत्र पाठवून त्यांच्या ठरावाबाबत कळवले आहे. असोसिएशनने कळवले की, “सर्व सदस्य त्यांच्या दुःखात सहभागी आहेत. असोसिएशनने शोकसभा घेऊन आरोपीचा जाहीर निषेध केला आहे.” आरोपीचे वकीलपत्र वडगाव मावळमधील कोणताही वकील घेणार नाही. असा ठराव काल 4 ऑगस्टला करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.