Pimpri News : कामगार नेते शिवाजीराव खटकाळे यांना भाई वैद्य स्मृती श्रमसारथी पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – कामगार चळवळीत महत्वपूर्ण योगदान देणारे कुशल संघटक शिवाजीराव खटकाळे यांना भाई वैद्य स्मृती श्रमसारथी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद आणि महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद या संस्थांच्या वतीने प्रतिवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो.

लोकनेते भाई वैद्य यांच्या आचार आणि विचारांचा पाईक म्हणून शिवाजीराव खटकाळे यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी हा पुरस्कार राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले आणि कष्टकरी महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते यांना देण्यात आला होता.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर पुरस्कार कार्यक्रमाचे नियोजन योग्य परिस्थिती पाहून करण्यात येईल अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले आणि सुदाम भोरे यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.