Pune news: जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे आज (शनिवारी) पहाटे कोरोनामुळे निधन झाले.  सर्व माध्यमांशी व पत्रकारांशी अत्यंत सलोख्यचे संबध असलेले शासकीय अधिकारी अशी त्यांची ओळख होती.

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सरग यांच्या प्रकृतीसाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. मनमिळावू, सतत दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून येणार माणूस असा सरग यांचा नावलौकिक होता. त्यांच्या निधनामुळे माहिती खात्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सरग यांचा माध्यम क्षेत्राशी मोठा संपर्क होता. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. पंधरा दिवसात त्यांना प्रमोशन मिळणार होते. पण तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. मागील रविवारी त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले. त्यातच हाय शुगर डिटेक्ट झाली. शेवटपर्यंत शुगर लेव्हल खालीच आली नाही. अखेर त्यांचे निधन झाले.

सरग यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अनेकवेळा डॉक्टरांशी संपर्क साधून मदत करण्याच्या सूचना केल्या. मात्र कोरोनापुढे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सरग यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले.

दरम्यान, कोरोना काळात चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांचा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.