Jayant Patil : जयंत पाटील यांच्यासोबत कामगार प्रश्नांवर कामगार नेत्यांची सविस्तर चर्चा

एमपीसी न्यूज : कष्टकरी कामगारांच्या (Jayant Patil) विविध प्रलंबित प्रश्नावर, अन्यायकारक नवीन कामगार कायदे तसेच बांधकाम कामगार, घरेलू कामगार, कंत्राटी कामगार, वाहन चालक मालक यांच्यासाठी विविध योजनासह त्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने लवकरच मुंबईत राज्यव्यापी बैठक घेण्यात यावी, अशी मागणी कष्टकरी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली.

जलसंपदा मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी पदाधिकारी यांच्यासह मुंबई येथे भेट घेऊन कामगार प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी उपाध्यक्ष राजेश माने, भास्कर राठोड, फरीद शेख, इरफान चौधरी, ओमप्रकाश मोरया आदी उपस्थित होते .

Pune : पुण्यात पार पडला ‘बहुपेडी’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा

महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणच्या कामगारांना किमान (Jayant Patil) आणि समान वेतन मिळत नाही. कंत्राटदाराकडून त्यांची पिळवणूक होत आहे. त्याचबरोबर नवीन कामगार कायद्याच्या कचाट्यामध्ये कामगार सापडून विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर कष्टकरी कामगारांचे अपघाती मृत्यूबाबत ही यावेळी चर्चा झाली. लवकरच कामगार मंत्री हसन मुश्रीफ, व पदाधिकारी यांच्यासोबत प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून बैठक आयोजित करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.