Chikhali : दगडाने ठेचून मजुराचा खून 

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवर काम करणा-या एका मजुराचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि.11) चिखलीतील, शेलारवस्तीमध्ये घडली. 

विजय प्रल्हाद सोळंकी (वय-40, रा. भांगरे कॉलनी चिखली) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे.

मूळचे वाशीमचे असलेले विजय हे सध्या चिखलीत राहत होते. ते बांधकाम साईटवर मोलमजुरीचे काम करत होते. शुक्रवारी सकाळी ते घरातून बाहेर गेले होते. मात्र, परत आले नव्हते. सायंकाळी पाचच्या सुमारास दगडखाणी जवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपास केला असता हा खून असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.