Vadgaon Maval News : स्व. केशवराव वाडेकर साहेब चिल्ड्रन पार्कचा उदघाटन सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज – पंचायत समिती आवारातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगांव यांच्या मागणी नुसार व पंचायत समिती मावळ यांच्या मान्यतेने स्व.उषाताई अरविंद पिंगळे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्व. केशवराव वाडेकर चिल्ड्रन पार्कचे उदघाटन बुधवार (दि 30) करण्यात आले. 

वडगांव शहर भाजपाचे कार्याध्यक्ष आणि वडगांव नगरपंचायतचे नगरसेवक प्रसाद अरविंद पिंगळे यांच्या वतीने आणि वडगांव शहर भाजपा यांच्या संकल्पनेतुन जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी येथील मुलांना खेळण्यासाठी तयार केलेल्या स्व. केशवराव वाडेकर साहेब चिल्ड्रन पार्कचे उदघाटन माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांच्या शुभ हस्ते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मावळ भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, महिला मोर्चा अध्यक्ष सायली बोत्रे, वडगांव शहर भाजपा अध्यक्ष किरण भिलारे, मावळ पंचायत समितीचे प्रभारी सभापती दत्तात्रय शेवाळे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, एकनाथ टिळे, सुवर्णा कुंभार, माजी उपसभापती शांताराम कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण, नितिन घोटकुले, जितेंद्र बोत्रे, पंचायत समिती सदस्यज्योती शिंदे, श्रीमती पुष्पाताई वाडेकर, महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला उपाध्यक्ष ज्योती जाधव, गणेश धानिवले, संस्कार चव्हाण, ज्येष्ठ नेते आणि श्री.पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, बाळासाहेब कुडे, अॅड. तुकाराम काटे, अरविंद पिंगळे, पंढरीनाथ भिलारे, नारायण ढोरे ,  बाबूलाल गराडे, सुरेश भंडारी, यदुनाथ चोरघे, मधुकर वाघवले, अंबादास बवरे,  वसंतराव भिलारे, विठ्ठल घारे ,माजी सरपंच पोपट वहिले, प्रदीप बवरे, संजय वाडेकर, नामदेव भसे, नगरसेवक प्रविण चव्हाण, अॅड.विजय जाधव, नगरसेवक दिनेश ढोरे, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, नगरसेविका अर्चना म्हाळसकर,सुनीता भिलारे,दिपाली मोरे, मावळ तालुका महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली ढोरे, मुख्याध्यापिका सुलोचना भारमळ, नितीन कुडे, संभाजी म्हाळसकर, सुधाकर ढोरे, बाळासाहेब भालेकर, रविंद्र काकडे, रमेश ढोरे,भूषण मुथा, विकी म्हाळसकर, शंकर भोंडवे, मनोज बाफना, कल्पेश भोंडवे, शेखर वहिले, योगेश म्हाळसकर, अतुल म्हाळसकर, विकास लिंबोरे, विनायक भेगडे, प्रा. विकास पिंगळे, दिलीप चव्हाण, प्रशांत चव्हाण , राजेंद्र उर्फ विकी म्हाळसकर, अजय भवार, आणि पिंगळे परिवाराचे सर्व सदस्य, शिक्षक वृंद  इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद शाळा, पंचायत समिती मावळ प्रांगण येथे संपन्न झाला.

माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून याचा आदर्श घेवून असे उपक्रम यापुढेही होतील असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र प्रदेश भाजपा उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांनी मावळ तालुक्यातील भाजपाच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देत या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मावळ भाजपा प्रभारी भास्कर  म्हाळसकर यांनी स्व. केशवराव वाडेकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याची माहिती दिली आणि असे उपक्रम यापुढेही होतील अशी ग्वाही दिली.

स्वागत किरण भिलारे यांनी केले, प्रास्ताविक प्रसाद पिंगळे यांनी केले. सूत्रसंचालन  अनंता कुडे आणि रविंद्र म्हाळसकर यांनी केले.आभार धनश्री भोंडवे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.