Leith’s softshell turtle : आंबी गावात शेतकऱ्याच्या शेतात सापडले दुर्मिळ कासव

एमपीसी न्यूज – आंबी गावात दुर्मिळ लेथिस सॉफ्ट शेल्ड टर्टल (Leith’s softshell turtle) सापडले आहे. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे म्हणाले, की काल रात्री मावळ तालुक्यातील आंबी गावात भात लावणी चालू असलेल्या निलेश खोजगे शेतकऱ्याच्या शेतात हे दुर्मिळ कासव सापडले आहे. त्याला लेथिस सॉफ्ट शेल्ड टर्टल असे म्हणतात. ही कासवाची गंभीरपणे धोक्यात असलेली प्रजाती (Critically endangered species) आहे. लोक यांची शिकार करतात त्यामुळे त्यांची संख्या खूप कमी झाली आहे.

Leith's softshell turtle

Pune Drug Trafficking: पुण्यातील अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील सुत्रधाराला अटक

ही कासवे (Leith’s softshell turtle) जुलै ते सप्टेंबर महिन्यात दिसतात. कारण हा त्यांचा विनीचा हंगाम असतो. खोजगे म्हणाले, की रात्री भात लावणी चालू असताना शेताच्या एका बाजूला खूप कावळे ओरडत असताना दिसले. तिथे जवळ गेल्यावर कासव दिसले. आम्ही ते ताब्यात घेतले व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांना बोलावले.
बी वाइल्ड फोरमच्या सदस्यांनी त्या कासवाचे वजन केले. त्याची लांबी व इतर माहिती घेऊन नोंद केली. त्या कसवाची तपासणी केली असता त्याला कोणतीही जखम असल्याची आढळली नाही. त्यामुळे त्याला जाधववाडी येथील तलावात सोडण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.