Pune Drug Trafficking: पुण्यातील अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील सूत्रधाराला अटक

एमपीसी न्यूज : राजस्थान येथून अंमली पदार्थ आणुन पुण्यात त्याची तस्करी करणाऱ्या टोळीतील सूत्रधारास अटक झाली आहे. (Pune Drug Trafficking) ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एक ने शनिवारी (दि.17) हडपसर येथे केली आहे.

उमेद कानाराम देवासी (वय 28 रा. हडपसर, मुळ राजस्थान) असे अटक आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार रामू प्रताप गुर्जर (वय 22) याला पोलिसांनी आधिच अटक केली होती.

Talegaon Dabhade : सुखसरींच्या वर्षावात बीबीए आणि बीसीएच्या विद्यार्थ्यांना निरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुर्जर याला पोलिसांनी शुक्रवारी (दि.16) हिराबार चौक येथून अडीच किलो अफीम सह अटक केली होती. त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने पुण्यातील सुत्रधार देवासी याच्याबद्दल माहिती दिली. (Pune Drug Trafficking) पोलिसांनी बातमीदारा मार्फत माहिती काढून शनिवारी देवासी याला हडपसर येथील पापडे वस्ती येथून अटक केली.

दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातून राजस्थान येथून चालणाऱ्या अंमली पदार्थाच्या रॅकेट पर्यंत पोलिसांना पोहचता येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.