Leopards in India : देशातील बिबट्यांच्या संख्येचा अहवाल प्रसिद्ध; सर्वाधिक बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

एमपीसी न्यूज : केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान ( Leopards in India) बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्ली येथे भारतातील बिबट्यांच्या स्थितीबाबत अहवाल जारी केला. या मध्ये  बिबट्यांची देशातील सर्वात जास्त लोकसंख्या मध्य प्रदेशात असून त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो तर तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आणि मग तामिळनाडू यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात 1985 बिबट्यांची नोंद झाली असून महाराष्ट्रात पुणे आणि नाशिक भागात सर्वाधिक बिबट्या आढळतात. 

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी राज्यांच्या वन विभागाच्या सहकार्याने व्याघ्र श्रेणीतील राज्यांमध्ये चतुर्वार्षिक “वाघ, सह-भक्षक, शिकार आणि त्यांचे अधिवास” या अभ्यासाचा भाग म्हणून बिबट्यांच्या लोकसंख्येचा अंदाज घेण्यासाठीच्या सर्वेक्षणाची पाचवी फेरी नुकतीच पूर्ण केली. या उपक्रमामुळे देशातील व्याघ्र संवर्धनाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान लाभले.

भारतातील बिबट्यांची अंदाजे लोकसंख्या 13,874 (श्रेणी: 12,616 – 15,132) इतकी असून 2018 मध्ये केलेल्या सर्वेक्षणादरम्यान ती 12,852 (12,172-13,535) इतकी होती. म्हणजेच समान क्षेत्राच्या सर्वेक्षणाच्या तुलनेत ताजी लोकसंख्या बिबट्यांच्या स्थिर लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करते. हा अंदाज बिबट्याच्या अधिवासाच्या 70% लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो. यामध्ये हिमालय आणि वाघांचे अधिवास नसलेल्या देशाच्या अर्ध-शुष्क भागांचे सर्वेक्षण केलेले नाही.

Lonavala: लोणावळ्यात अजित पवार गटाला मोठा धक्का; 125 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला राजीनामा

मध्य भारतात बिबट्यांच्या संख्येत स्थिर किंवा किंचित वाढ  दिसून येते. म्हणजेच 2018 साली 8071 तर 2022 मध्ये 8820 इतकी बिबट्यांची संख्या आहे. शिवालिक टेकड्या आणि गंगेच्या पठारी भागात मात्र या संख्येत घट आढळून आली आहे. 2018 साली 1253 बिबट्यांची संख्या होती तर 2022 साली 1109 इतकी संख्या दिसून आली आहे. जर आपण 2018 आणि 2022 मध्ये संपूर्ण भारतात केलेल्या सर्वेक्षणाच्या क्षेत्राचा विचार केला तर बिबट्यांच्या संख्येत 1.08% वार्षिक वाढ दिसून येते आहे.

बिबट्यांची संख्या –  Leopards in India 

 

राज्य 2018 वर्ष 2022 वर्ष 
मध्यप्रदेश34213907
महाराष्ट्र1,6901985
कर्नाटक1,7831,879
तमिळनाडू8681,070

 

सर्वाधिक बिबट्या असणारे व्याघ्र प्रकल्प किंवा स्थळ म्हणजे नागराजुनसागर श्रीशैलम (आंध्र प्रदेश), त्यानंतर पन्ना (मध्य प्रदेश), आणि सातपुडा (मध्य प्रदेश) हे होय.

‘प्रोजेक्ट टायगरच्या संवर्धनाचा वारसा वाघांच्या पलीकडे विस्तारला आहे, हे बिबट्याच्या स्थिती अहवालातून स्पष्ट होत आहे, यामध्ये प्रजातींच्या (Leopards in India) संरक्षणासाठी केले जाणारे व्यापक प्रयत्न दिसून येतात. या अहवालात संरक्षित क्षेत्राच्या पलीकडेही वाघांच्या संरक्षणासाठीची वचनबद्धता दिसून येते, यासाठी वन विभागाच्या समर्पित प्रयत्नांचे कौतुक आहे. प्रोजेक्ट टायगर च्या सर्वसमावेशक दृष्टिकोनातून जैवसंस्थेचे परस्परसंबंध आणि वैविध्यपूर्ण प्रजातीच्ये संरक्षण दिसून येते. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, या संवर्धन प्रवासात एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य या तत्वाचे पडसाद बघायला मिळतात.’ – केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री, भूपेंद्र यादव

भारतातील बिबट्यांच्या लोकसंख्येचा अंदाज घेण्यासाठीच्या सर्वेक्षणाच्या (2022) पाचव्या फेरीत 18 व्याघ्र राज्यांमधील वाघांच्या अधिवासांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते, ज्यामध्ये चार प्रमुख व्याघ्र संवर्धन भूदृश्यांचा समावेश आहे. हिमालयातील अतिउंच 2000 एमएसएल (~ 30% क्षेत्र) भाग, जास्त जंगल नसलेले अधिवास, आणि शुष्क प्रदेशांमध्ये बिबट्यांच्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले नाही. या फेरीत मांसभक्षक प्राण्यांच्या पाऊलखुणा आणि शिकारीसाठी आवश्यक विपुलतेचा अंदाज लावण्यासाठी 6,41,449 किलोमीटर अंतरावरील प्रदेशाचे पायी सर्वेक्षण करण्यात आले.

बिबट्यांच्या संवर्धनात संरक्षित क्षेत्रांचा किती महत्वपूर्ण सहभाग असतो हे या सर्वेक्षणातून समोर आले. व्याघ्र प्रकल्प हे प्रमुख आधारस्तंभ म्हणून कार्य करत असतानाच या क्षेत्राबाहेरील बाह्य जगाचा देखील ही तफावत भरून काढण्यात सहभाग असणे तितकेच महत्वाचे आहे. मानव-वन्यजीव या वाढत जाणाऱ्या संघर्षामुळे बिबट्या आणि मानवी समाज या दोघांनाही धोका पोहोचतो.

 

मानव आणि बिबट्या यांच्या सहअस्तित्वावर प्रकाश टाकणाऱ्या बिबट्यांच्या स्थितीच्या अहवालातून वसुधैव कुटुंबकम या दृष्टीचे उदाहरण दिसून येते आहे. जैवविविधता कमी होत असताना वन्यजीवांप्रती भारताची अद्वितीय समुदाय सहिष्णुता जागतिक स्तरावर एक आदर्श म्हणून काम करते आहे. – केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री, अश्विनी कुमार चौबे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.