Wakad : शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे; वाकड पोलीस, प्रेरणा माध्यमिक विद्यालय यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज – वाकड पोलीस आणि प्रेरणा माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींसाठी सौदामिनी स्व-संरक्षण अभियान घेण्यात आले. यामध्ये डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत मुलींना निशस्त्र हल्ला आणि इतर स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले.

सौदामिनी स्व-संरक्षण अभियान 2020 चे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे, मुख्याध्यापक यशवंत पवार, डिफेन्स स्पोर्ट अकॅडमीचे संचालक अरविंद मोरे, शीतल मोरे, प्रशिक्षक रेखा लोखंडे, श्रुती सुर्वे, दीक्षा पालके, निशांत पंचमुखी, सुभाष जाधव आदी उपस्थित होते.

सौदामिनी अभियानाअंतर्गत शालेय मुलींना निशस्त्र हल्ला, गुड टच बॅड टच, बॉडी वीक पॉईंट, रियल अटॅक, पोलीस यंत्रणा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा या उद्देशाने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.