Lockdown 5.0 Pune Update: पुणे शहरासाठीची नियमावली आज जाहीर करणार- महापौर

Lockdown 5.0 Pune Update: Rules for Pune city will be released tomorrow (Monday) - Mayor

एमपीसी न्यूज – केंद्र शासनाच्या पाठोपाठ राज्य शासनानेही कोरोना लॉकडाऊनला 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याप्रमाणे राज्य शासनाने आज मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या. पुणे शहरासाठीची नवीन नियमावली महापालिकेच्या वतीने आज (सोमवारी) प्रसिद्ध करण्यात येईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी रात्री उशिरा ट्वीट करून जाहीर केले.

राज्य शासनाने दिलेले आदेश आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यासाठी दिलेली मुभा याला अनुसरून नवीन नियमावली बनविण्याचे काम सुरू असून ही नवी नियमावली महापालिकेतर्फे आज (सोमवारी) प्रसिद्ध केली जाणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उद्योगनगरीसाठी लॉकडाऊन 5.0 चे आदेश काल रात्री काढले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.