Maharashtra Corona Update : 2487 नवीन रुग्णांची नोंद, तर 1248 रुग्ण कोरोनामुक्त

Maharashtra corona update, 2487 new corona infected patients increase in single day in state

एमपीसी न्यूज – राज्यात काल (रविवारी) कोरोनाच्या 2487 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 67 हजार 655 वर गेली आहे. यापैकी सध्या राज्यात 36031 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, काल राज्यात 89 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2286 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल 1248 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत 29 हजार 329 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

काल झालेल्या मृत्यूंपैकी 46 पुरुष तर 43 महिला आहेत. त्यातील 47 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 35 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 7 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 89 रुग्णांपैकी 56 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

काल झालेल्या 89 मृत्यूपैकी 39 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहे. तर उर्वरित मृत्यू हे 27 एप्रिल ते 27 मे या कालावधीत आहे. या कालावधीत झालेल्या 50 मृत्यूपैकी मुंबई 27, नवी मुंबई 9, मालेगाव 6, कल्याण डोंबिवली 4, ठाणे 3 तर सोलापूरमधील 1 जण आहे.

कालपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 62 हजार 176 नमुन्यांपैकी 67655 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 58 हजार 100 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 34 हजार 480 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका : बाधित रुग्ण- (३९,६८६), बरे झालेले रुग्ण- (१६,७९१), मृत्यू- (१२७९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(६), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,६१०)

ठाणे: बाधित रुग्ण- (९५८५), बरे झालेले रुग्ण- (३४००), मृत्यू- (२००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९८५)

पालघर: बाधित रुग्ण- (१०१८), बरे झालेले रुग्ण- (३७८), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१०)

रायगड: बाधित रुग्ण- (११०८), बरे झालेले रुग्ण- (५७३), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९४)

नाशिक: बाधित रुग्ण- (११३५), बरे झालेले रुग्ण- (८९३), मृत्यू- (६६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७६)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (१२०), बरे झालेले रुग्ण- (५७), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५७)

धुळे: बाधित रुग्ण- (१४०), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८)

जळगाव: बाधित रुग्ण- (६१६), बरे झालेले रुग्ण- (२७७), मृत्यू- (७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६७)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (३५), बरे झालेले रुग्ण- (२०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

पुणे: बाधित रुग्ण- (७९१९), बरे झालेले रुग्ण- (३६९९), मृत्यू- (३२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८९१)

सोलापूर: बाधित रुग्ण- (८९७), बरे झालेले रुग्ण- (३७१), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५६)

सातारा: बाधित रुग्ण- (५२३), बरे झालेले रुग्ण- (१४८), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५९)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (४५७), बरे झालेले रुग्ण- (१५०), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०३)

सांगली: बाधित रुग्ण- (११२), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (३३), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (२६४), बरे झालेले रुग्ण- (९८), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६१)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (१५०१), बरे झालेले रुग्ण- (९८६), मृत्यू- (६५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४५०)

जालना: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (५४), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१)

हिंगोली: बाधित रुग्ण- (१४९), बरे झालेले रुग्ण- (९८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१)

परभणी: बाधित रुग्ण- (६३), बरे झालेले रुग्ण- (३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५९)

लातूर: बाधित रुग्ण- (१२५), बरे झालेले रुग्ण- (६०), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (७३), बरे झालेले रुग्ण- (१९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३)

बीड: बाधित रुग्ण- (४७), बरे झालेले रुग्ण- (१३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (३४)

नांदेड: बाधित रुग्ण- (१११), बरे झालेले रुग्ण- (८६), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९)

अकोला: बाधित रुग्ण- (५८४), बरे झालेले रुग्ण- (३१९), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३६)

अमरावती: बाधित रुग्ण- (२२६), बरे झालेले रुग्ण- (१२४), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (१३०), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (६२), बरे झालेले रुग्ण- (३३), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२६)

वाशिम: बाधित रुग्ण- (८), बरे झालेले रुग्ण- (६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२)

नागपूर: बाधित रुग्ण- (५७४), बरे झालेले रुग्ण- (३५८), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०६)

वर्धा: बाधित रुग्ण- (१२), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११)

भंडारा: बाधित रुग्ण- (३२), बरे झालेले रुग्ण- (९), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२३)

गोंदिया: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (३२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (२५), बरे झालेले रुग्ण- (१५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (३५), बरे झालेले रुग्ण- (८), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (५९), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४)

एकूण: बाधित रुग्ण-(६७,६५५), बरे झालेले रुग्ण- (२९,३२९), मृत्यू- (२२८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(९),ॲक्टिव्ह रुग्ण-(३६,०३१)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट 3,157 झोन क्रियाशील असून आज एकूण 18 हजार490 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 70.14 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.