Lockdown Update: तळेगाव, चाकण, आळंदी, हिंजवडीतही लॉकडाऊन

Lockdown in Talegaon, Chakan, Alandi, Hinjewadi too

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू नियंत्रणासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात आज (सोमवारी) मध्यरात्रीपासून 23 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याचा आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आज (सोमवारी) संध्याकाळी काढला.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी काल रात्री लॉकडाऊनबाबत आदेश जारी केले, मात्र महापालिका क्षेत्राबाहेरील भागात लॉकडाऊनबाबत प्रचंड संभ्रमाचे वातावरण होते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी आदेश काढल्यामुळे अखेर त्याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.

महापालिका क्षेत्राबाहेरील मात्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या निमशहरी व ग्रामीण भागातही हा लॉकडाऊन लागू असणार आहे. हिंजवडी, माण, देहूरोड, तळेगाव, शिरगाव, तळेगाव एमआयडीसी, चाकण, आळंदी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत लॉकडाऊनचे नियम लागू होणार आहेत.

लॅाकडाऊन दरम्यान खालील बाबींना संपुर्ण मनाई राहील.  

  • शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था,सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपुर्णतः बंद राहतील.
  • मेट्रो / लोकल रेल्वे सेवा बंद राहतील.
  • रेल्वे प्रवासी वाहतुक जोपर्यंत विशेष स्वतंत्र आदेशाद्वारे आणि प्रमाणित कार्यपद्धतीनुसार  परवानगी देण्यात येणार नाही तो पर्यंत बंद राहतील.
  • सर्व सिनेमागृहे, व्यायामशाळा/ जिम्नॅशियम, जलतरण तलाव, करमणुक उदयाने, नाटयगृहे, बार आणि सभागृहे, असेंब्ली हॉल, मंगल कार्यालय, सार्वजनिक / खाजगी क्रिडांगणे, मोकळया जागा आणि तत्सम ठिकाणे संपुर्णतः बंद राहतील.
  • सार्वजनिक ठिकाणी/ ररत्यावर मॉर्निंग वॉक, इव्हीनिंग वॉक, जॉगिंग, शाररीक व्यायाम करण्यास मनाई राहील.
  • सर्व प्रकारचे सामाजिक/राजकीय/ क्रिडा/मनोरंजन/ शैक्षणिक/ सांस्कृतिक/ धार्मिक कार्यक्रम, सभा व इतर मेळावे यांना बंदी राहील.
  • लग्नसमारंभ, रवागतसमारंभ बंद राहतील मात्र पुर्वी परवानगी घेतलेले लग्नसमारभासाठी 20 पेक्षा कमी व्यक्तींच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येतील. तसेच अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा अधिक व्यक्तीना परवानगी नाही.
  • केस कर्तनालय, स्पा, सलुन, ब्युटी पार्लर इत्यादी आस्थापना व सेवा संपुर्ण बंद राहतील.
  • खाजगी कार्यालये / आस्थापना संपुर्णतः बंद राहतील.
  • उपहारगृह, लॉज, हॉटेल (वंदे भारत योजनेअंतर्गत कोविड 19 करीता वापरात असलेले वगळुन) डान्स, रिसॉर्ट संपुर्णतः बंद राहतील.

खालील बाबींना अटी व शर्तीवर परवानगी राहील.

  • पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतुक बंद राहील.  (अत्यावश्यक सेवेतील वाहने, पुर्वपरवानगी प्राप्त वाहने वगळता)  त्यामध्ये अंतरराज्य सार्वजनिक वाहतुक, अंतरजिल्हा व अंतरराज्य बस वाहतुक, सार्वजनिक व खाजगी प्रवासी वाहने, दुचाकी, तीनचाकी व चारचाकी, ऑटो रिक्षा, सायकल रिक्षा, टॅक्सी व कँब सेवा पुर्णतः बंद राहतील.
  • पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका औदयोगिक आस्थापना हया पुर्वी प्रमाणे सुरु राहतील. तसेच महानगरपालिके क्षेत्राव्यतिरिक्‍त पोलीस आयुक्तालयाचे इतर हद्दीतील औदयोगिक आस्थापना पुर्वीप्रमाणे सुरु राहतील.
  • औदयोगीक क्षेत्रात कंपन्यामध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचार्यांना कामकाजाकरीता येण्याजाण्यासाठी केवळ पासधारक दुचाकी, चारचाकी व निश्‍चित केलेल्या बसमधुनच प्रवासाची परवानगी असेल. फक्त प्रतिबंधित क्षेत्राबाहेरीलच कर्मचाऱ्यांना कामावर उपस्थित राहता येईल.
  • दैनिक वर्तमानपञे, नियतकालिके यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल/ प्रिंटमिडीया यांची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपञांचे वितरण सकाळी 6 ते 9 वेळेमध्येच क़रता येईल.
  • पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सर्व प्रकारचे बांधकाम/कन्स्ट्रक्शनची कामे संपुर्णतः बंद राहतील तथापी ज्या बांधकामाच्या जागेवर कामगारांची निवास व्यवस्था असेल (इन-सीटु कन्ट्रक्शन) त्यांना परवानगीने काम सुरू ठेवता येईल.
  • पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रामध्ये सुरू असलेले स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्प, मेट्रो, स्मार्ट सिटी, राष्ट्रीय महत्वाचे प्रकल्प इ. यांचे काम संबंधित प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीसह सुरू ठेवता येईल.
  • मद्य विक्री बंद राहील.
  • सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यावसाय करणारे व्यापारी दुकाने दिनांक 14 ते 18 जुले दरम्यान बंद राहतील. तद्नंतर दिनांक 19 ते 23 जुलै या कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 12 वा. पर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाणे व त्याचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरु राहतील इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील.
  • दुध विक्री व दुधाची घरपोच वितरण संपुर्ण कालावधीत सुरू राहिल.
  • सर्व मेडीकल दुकाने 24 तास सुरू राहतील.
  • मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री दिनांक 14 ते 18 पर्यंत संपुर्णतः बंद राहतील तद्नंतर दिनांक  19 ते 23 याकालावधीत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत चालु राहतील.
  • सर्व किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे मोंढा/ मंडई/ आडत भाजी मार्केट/ फळे विक्रेते आठवडी व दैनिक बाजार/ फेरीवाले हे सर्व ठिकाणी दिनांक 14 ते 18 दरम्यान संपुर्णत: बंद राहतील. तद्नंतर 19 ते 23 या कालावधीत शेतकरी आठवडी बाजार तसेच भाजी व फळांचे विक्री करणारे अधिकत फेरीवाले मार्फत करण्यात येणारी विक्री सकाळी सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत चालु राहतील.
  • सर्व औषधांची दुकाने, तसेच ऑनलाईन औषध वितरण सेवा संपुर्ण कालावधीकरीता सुरु राहतील.
  • सर्व खाजगी व सार्वजनिक वैदयकीय सेवा, पशुचिकीत्सा सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील.
  • वृद्ध, आजारी व्यक्‍तींना नियक्‍त केलेले मदतनिस यांच्या सेवा सूरु राहतील.
  • संस्थात्मक अलगिकरण/विलगीकरण व कोविड केअर सेंटर करता महानगरपालिकेने ताब्यात कोवीड मान्यता दिलेल्या कार्यालयाच्या जागा, इमारती नियमानुसार सुरु राहतील.
  • झोमॅटो, स्वीगी व तत्सम ऑनलाईन पोर्टलवरुन मागविले जाणारे खादयपदार्थ पुरवठा सेवा 14 ते 23 रोजी पर्यंत बंद राहतील.
  • ई-कॉमर्स सेवा उदा. अमॅझॉन, फ्लीपकार्ट व तत्सम सेवा दिनांक 14 ते 18  रोजी पर्यंत बंद राहतील. तद्‌नंतर दि. 19 रोजी पासुन चालु राहतील.
  • जीवनावश्यक वस्तुंचे, औषधांचे व तयार अन्नपदार्थाचे घरपोच वाटप सकाळी 8 ते राजी 10 या कालावधीतच मनपाच्या पुर्व मान्यतेने पास घेवुन सुरू राहील.
  • पेट्रोलपंप व गॅसपंप सकाळी 9 ते दुपारी 6 या वेळेत सुरु राहतील व ते केवळ शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील पुरवठा साखळीतील वाहने तसेच पासधारक वाहनांना इंधन पुरवठा करतील.
  • एलपीजी गॅस सेवा घरपोच गॅस वितरण नियमानुसार राहील.
  • पाणीपुरवठा करणारे टॅकरला नियमानुसार परवानगी राहील.

65 वर्षावरील जेष्ठ नागरिक, अतिजोखमीचे आजार (मधुमेह, उच्च रक्‍तदाब, दमा, यकूत व मुञपिंडाचे आजार, कर्करोग, एचआयव्ही बाधित रुग्ण इ.) असलेल्या व्यक्‍ती, विकलांग व्यक्‍ती, गरोदर महिला आणि दहा वर्षाखालील मुले यांनी अत्यावश्यक आणि वैदयकीय कारण वगळता घरातच थांबणे आवश्यक आहे.

अंतरजिल्हा व अंतरराज्य प्रवासासाठी ई-पास आवश्यक 

संचारबंदीचे कालावधीत अत्यावश्यक / जीवनावश्यक बार्बीसाठी प्रवास करावयाचा असल्यास पास घेणे आवश्यक आहे. सदरचे पास पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत मनपा कार्यालयाकडुन व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील महानगरपालिका हद्दीखेरीज इतर क्षेत्राकरिता संबघित पोलीस स्टेशन यांचेकडून पासेस अदा करण्यात येतील. तसेच अत्यावश्यक कारणाकरिता अंतरजिल्हा व अंतरराज्य प्रवासासाठी covid19.mhpolice.in या संकेत स्थळावर ई- पासेसाठी अप्लाय करता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.