Maharashtra News : महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा लोकेश चंद्रा यांनी स्वीकारला पदभार

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (Maharashtra News) म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी लोकेश चंद्रा यांनी शुक्रवारी (दि. 2) पदाची सूत्रे स्वीकारली. याआधी ते मुंबई ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक पदावर कार्यरत होते.

Theur : काय?दुचाकीच्या इंजिनाद्वारे औषध फवारणी.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा हे 1993 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी (दिल्ली) मधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी आणि एमटेक (स्ट्रक्चर्स) पदवी प्राप्त केली आहे.

चंद्रा यांनी यापूर्वी सिडकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम केले आहे. तसेच नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष म्हणून लोकेश चंद्रा कार्यरत होते. सन 2008 ते 2015 या कालावधीत ते केंद्र शासनाच्या सेवेत प्रतिनियुक्तीवर होते. या काळात चंद्रा यांनी पोलाद मंत्रालयाचे सहसचिव व ऊर्जा मंत्रालयाचे संचालक (Maharashtra News) म्हणून काम पाहिले.

 

Pune : माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत पुणे जिल्ह्याची सर्वोत्तम कामगिरी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.