Theur : काय?…दुचाकीच्या इंजिनाद्वारे औषध फवारणी!

एमपीसी न्यूज : हो हे शक्य आहे. थेऊर (Theur) मधील कुंजीर वस्ती येथील एका  शेतातील कामगार जुन्या दुचाकीच्या इंजिन सहाय्याने व त्या जोडीस दुसरे  औषध फवारणी उपयोगी इंजिन बसवत शेतात औषध फवारणी करतात.

त्यामुळे शेतात औषध फवारणी करण्यास कमी वेळ तसेच औषध फवारणी वेळी कष्ट ही कमी लागत आहे. पाठीवर ओझे नाही .पाणी वाहण्याचा त्रास नाही. ड्रम मधील औषध खेचण्याकरिता एक नळी येथे दिसून येत आहे. खेचलेले औषध दुसऱ्या नळी द्वारे बाहेर फवारले जात आहे. औषध फवारणी करिता लांब नळीचा उपयोग केला गेला आहे. योग्य प्रमाणात पाणी औषध ड्रमा मध्ये टाकले जाते. जुन्या दुचाकी इंजिनाचा येथे चांगल्या  कल्पकतेने वापर केला गेला आहे.

Pune : जवानांच्या कुटुंबियांनी घेतला गायन-नृत्याविष्काराचा आनंद

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.