Pimpri : शहरात विविध संस्था, संघटनांच्या वतीने लोकमान्य टिळकांना अभिवादन 

एमपीसी  न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात विविध संस्था, संघटनांच्यावतीने लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले.  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथि निमित्त निगडी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, मनसे गटनेते सचिन चिखले, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसेविका कमल घोलप, सुमन पवळे, नगरसेवक  उत्तम केंदळे,  अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, आदी उपस्थित होते. जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कूल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, तेजल कोळसे पाटील आदी उपस्थित होते.

इयत्ता पहिलीतील शामली सावंत या विद्यार्थिनीने ‘ हे राष्ट्र देवतांचे’ या गीतामधून लोकमान्य टिळक यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. प्रज्ज्वल तिखे आणि हिमांशू चौधरी या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांची वेशभूषा करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी लोकमान्य टिळकांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. इयत्ता तिसरीतील श्रेया करपे आणि इयत्ता सहावीतील अवि राठोड या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी माहिती दिली.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ या वाक्याने कार्यक्रमाची सांगता शिक्षिका मोनिका रामास्वामी आणि श्रुती तावरे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.