Loksabha Election 2024 : पठ्ठ्या 98 निवडणुका हरला पण खचला नाही; लोकसभेसाठी दोन जागांवर उमेदवारी अर्ज भरून केली 100 व्या निवडणुकीची तयारी

एमपीसी न्यूज – सलग काही वेळेला राजकीय आखाड्यात पराभवाला सामोरे गेल्यानंतर ( Loksabha Election 2024 ) थेट राजकीय संन्यास घेण्याबाबत सल्ले दिले जातात. मात्र जर एखादा उमेदवार 98 वेळा हरूनही 100 व्या वेळेस हरण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणाल… होय, असाच काहीसा प्रकार आहे. आग्रा जिल्ह्यातील खेरागड येथील हसनुराम आंबेडकर यावर्षी 100 व्या वेळेला हरण्यासाठी तयार आहेत.

हसनुराम आंबेडकर हे बहुजन समाज पक्ष अस्तित्वात येण्यापूर्वी ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटी एम्प्लॉईज असोसिएशनचे ज्येष्ठ सदस्य होते. त्यांनी सन 1985 पासून निवडणुका लढविण्यास सुरुवात केली. पहिली निवडणूक त्यांनी बहुजन समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात लढवली. ही निवडणूक उत्तर प्रदेश विधानसभेची होती. मात्र पहिल्या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही.

Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेसाठी आजपासून नोंदणी सुरु

मात्र त्यांनी निवडणूक लढविणे सुरूच ठेवले. त्यांनी आजवर सुमारे 39 वर्षांच्या कालावधीत तब्बल 98 निवडणुका लढवल्या. त्या प्रत्येक निवडणुकीत त्यांना अपयश मिळाले. तरी देखील त्यांनी यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा उमेदवारी अर्ज भरला आहे. आग्रा आणि फतेहपूर सिक्री लोकसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

दोन्ही ठिकाणी आपल्याला पराभव मिळू शकतो. तरी देखील आपण उमेदवारी दाखल केली आहे. कारण आपण लोकांना एक चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न करतो. आपला 100 निवडणुका लढवण्याचा मानस असून यानंतर निवडणुका लढवणार नसल्याचे आंबेडकर सांगतात.

हसनुराम आंबेडकर यांनी ग्रामपंचायत पासून ते विधानसभा आणि लोकसभे पर्यंतच्या जवळपास सर्वच निवडणुका लढवल्या आहेत. सन 1989 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना सर्वाधिक 36 हजार मते मिळाली होती. त्यांनी राष्ट्रपती पदासाठी देखील उमेदवारी दाखल केली होती. मात्र त्यांची उमेदवारी नाकारण्यात ( Loksabha Election 2024 ) आली होती.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.