LokSabha Elections 2024 : जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मुळशी परिसरातील मतदान केंद्रांना भेट

एमपीसी न्यूज –  जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी (LokSabha Elections 2024) मुळशी परिसरातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला.

यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे, सोबत उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले, मुळशी तहसीलदार रणजित भोसले , पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव आदी उपस्थित होते.

Pimpri : हरयाणा झारखंडवर भारी; 14वी हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

डॉ. दिवसे म्हणाले, मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक सुविधा (LokSabha Elections 2024) उपलब्ध करुन देण्यात याव्यात.  मतदारांना कोणताही त्रास होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी पाच 5 पेक्षा अधिक मतदान केंद्र आहेत, अशा ठिकाणी मतदारांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

डॉ.दिवसे यांनी यावेळी  कासार आंबोली येथील साहित्य वाटप व स्वीकृती केंद्राची पाहणी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.