Lonavala : खंडाळ्यातील बोरघाटात खासगी प्रवासी बसला अपघात; सुदैवाने जिवितहानी टळली

एमपीसी न्यूज- जुन्या पुणे – मुंबई महामार्गावरील बोरघाटात शिंग्रोबा देवळाजवळ आज, सोमवारी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास एका खासगी प्रवासी बसला अपघात झाला. सुदैवाने ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा कठड्याला अडकल्याने दरीत पडता पडता वाचली. यामुळे मोठी दुर्घटना ठळली.

_MPC_DIR_MPU_II

मिळालेल्या माहितीनुसार खंडाळा घाटातील अवघड टप्पा पार करत सिध्देश्वर ट्रव्हर्ल्स कंपनीची खासगी प्रवासी बस क्र. (MH 04 FK 0201) ही पुण्याच्या दिशेने येत होती. शिंग्रोंबा मंदिरासमोरील अवघड वळणावरील चढणीवर मागे घसरत आली, मागे मोठी दरी होती सुदैवाने ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा कठड्याला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.

चार प्रवासी यामध्ये किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खोपोलीतील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. या अपघातानंतर जुन्या महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.