Lonavala : आयएनएस शिवाजी येथे अखिल भारतीय नौसैनिक शिबिराचा समारोप

एमपीसी न्यूज – लोणावळा येथील आयएनएस शिवाजी या नौदल (Lonavala) तळावर अखिल भारतीय नौसैनिक शिबिर 2023 चा (एआयएनएससी 2023) समारोप झाला. दहा दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये 17 संचालनालयातील छात्रसैनिकांनी सहभाग घेतला. राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्र संचालनालय आणि नौदल यांच्या संयुक्त विद्यमाने या अखिल भारतीय नौसैनिक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह म्हणाले, “आयएनएस शिवाजी येथे एआयएनएससी 2023 दरम्यान छात्रसैनिकांनी दाखवलेल्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.
हे शिबीर आमच्या तरुण छात्रसैनिकांची केवळ विलक्षण प्रतिभाच अधोरेखित करत नाही तर सहभागींमध्ये सौहार्दाची भावना देखील बळकट करते. या शिबिरासाठी दक्षिण नौसेना कमांड मुख्यालय आणि आयएनएस शिवाजी यांनी दिलेले पाठबळ आणि संसाधने हे राष्ट्र उभारणीप्रती त्यांच्या खऱ्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे.”
नेतृत्व कौशल्ये वाढवण्याच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा, सराव आणि कार्यशाळांसह या वर्षीच्या स्पर्धांमध्ये छात्रसैनिकांना शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्ट्या आव्हान देणाऱ्या अनेक उपक्रमांचा समावेश होता.
या वर्षी ही स्पर्धा महाराष्ट्र तंत्रशिक्षण संचालनालयाने जिंकली. तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा तंत्रशिक्षण संचालनालये उपविजेते (Lonavala) ठरली.