Lonavala : ‘मन की बात’चा शतकपूर्ती सोहळा उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – ‘मन की बात’चा शतकपूर्ती सोहळा अतिशय (Lonavala) उत्साहात आणि दिमाखात साजरा झाला. लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघ विरंगुळा केंद्रामध्ये जिवंत देखावे सादर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

ह्या कार्यक्रमास मार्गदर्शन, पुणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य अविनाश बवरे ह्यांचे लाभले. तसेच कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, माजी नगरसेवक राजाभाऊ खळदकर,माजी नगरसेवक देविदास कडू, ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक अरविंद कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार कुमठेकर काका, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. नामदेव डफळ आदी अनेक मान्यवरांचे आर्शिवाद लाभले. कार्यक्रमानंतर अल्पोपहाराची व्यवस्था होती.

Pashan : पाषाण येथील कंपनीच्या ऑफीसमधून एक लाखांची रोकड चोरीला

संपूर्ण संकल्पना श्रिया रहाळकर यांची होती. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, खजिनदार गोरख चौधरी सर, प्रमोद बंन्सल सर, सचिन रहाळकर,किशोर पंड्या सर तसेच जेष्ठ नागरिक संघाचे सर्व सहकारी (पाटील, गव्हले, धारप, लांबट, माधुरी) काकू, (शैला, मंगल, शारदा, सरोज, ज्योती, प्रतिक्षा, रश्मी, विजया) ताई, दिपाली वाकडकर (Lonavala) आणि सर्व शाळकरी मुला मुलींचे मोलाचे सहकार्य लाभले त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रिया रहाळकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.