Pashan : पाषाण येथील कंपनीच्या ऑफीसमधून एक लाखांची रोकड चोरीला

एमपीसी न्यूज – पाषाण येथील डिल्व्हेरी प्रायव्हेट लिमीटेड या (Pashan) कंपनीच्या ऑफिसमधून तब्बल 1 लाख 14 हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली आहे. हा प्रकार पाषाणमधील कंपनीच्या ऑफीसमध्ये 30 एप्रिल ते 1 मे या कालावधीत घडला आहे.

Pimpri : शस्त्र बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक
याप्रकरणी संकेत काशीनाथ मालुसरे (वय 34 रा. वारजे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोराने चावीच्या सहाय्याने फिर्यादी यांच्या ऑफीसच्या लॉकरमधून 1 लाख 14 हजार 594 रुपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.