BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : लोणावळ्यात युवक काँग्रेसचे घर चलो अभियान

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- अखिल भारतीय काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे व मोदी सरकारचा पाच वर्षातील नाकर्तेपणा समाजापर्यंत पोहोचवण्याकरिता लोणावळा युवक काँग्रेसच्या वतीने लोणावळा शहरात आजपासून घर चलो अभियान सुरू केले आहे.

पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, प्रांतिक सदस्य दत्तात्रय गवळी, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निखिल कवीश्वर याच्या उपस्थिती मध्ये हनुमान टेकडी भागात ही मोहीम सुरू करण्यात आली.

यावेळी काँग्रेस पक्षाच्या गट नेत्या आरोही तळेगावकर, मावळ युवक काँग्रेसचे अध्यक्ष विलास मालपोटे, फिरोज बागवान, दत्तात्रय दळवी, निलेश आडकर, मजहर शेख, अशोक रोकडे, तारिक बागवान, नजीम शेख यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सूचनेनुसार लोणावळा शहरात घरो घरी जाऊन ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे निखील कवीश्वर यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A4

.