Lonavala : महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाची फसवणूक करू नये; जो शब्द दिलाय तो पाळावा – नाना पटोले

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाची फसवणूक (Lonavala) करू नये, जो शब्द मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे तो शब्द पाळावा. मनोज जरांगे पाटील यांनी तब्येत खालावली आहे याकरिता लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. लोणावळ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर लोणावळ्यात आजपासून सुरू झाले आहे. या शिबिराच्या उद्घटनापूर्वी नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

नाना पटोले म्हणाले, 2014 च्या निवडणुकीच्या वेळी भाजपाने महाराष्ट्रातील मराठा, धनगर व इतर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. आज महाराष्ट्रात हे समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहे. असे असताना भावनाशून्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, निवडणुका आल्या की मोर्चे व आंदोलने होत असतात त्याचा निवडणुकांवर परिणाम होत नाही असे म्हणत, आंदोलने कर्त्यांचा अपमान करत आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात ताळमेळ राहिलेला नाही.

मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समाजाला व जरांगे पाटील यांना शब्द दिला आहे, गुलाल कपाळाला लावला आहे, तो शब्द पाळत न्याय द्यावा, विरोधी पक्ष म्हणून आम्ही पहिल्यापासून मराठा समाजाच्या सोबत आहोत. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावत मराठा समाजाला आरक्षण द्या ही आमची देखील मागणी आहे.

मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री यांनी स्वीकारला आहे. तो त्यांनी प्रसिद्ध करावा. सर्वे कसा व कोठे केला, जस्टिक मेश्राम यांनी का कमी करण्यात आले याची स्पष्ट माहिती मुख्यमंत्री यांनी द्यावी. सत्ताधारी हे राज्याचे मालक नाहीत, जनतेचे ट्रस्टी आहेत. लोकशाहीत जनतेला उत्तर देण्यास ते बांधील आहेत व त्यांनी उत्तर द्यावे असे नाना पटोले म्हणाले.

Chinchwad : रामकृष्ण मोरे यांच्या स्मृती आप्पा बारणे यांनी ताज्या ठेवल्या – डॉ. सदानंद मोरे

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आताच्या आता राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल प्रसिद्ध करावा व दोन तासात त्यावर अध्यादेश काढावा, याकरिता कोणत्याही अधिवेशनाची गरज नाही व 20 तारखेपर्यंत थांबायची देखील गरज नाही. अध्यादेश सहमत करायला अधिवेशन घ्यावे लागणार आहे. अहवालात काय आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्यासह सर्व समाजाला व आम्हाला देखील समजावे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे, उद्या त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आयोगाचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करण्याचे आवाहन शासनाला केले आहे.

लोकशाहीचा गळा घोटला जात आहे – बाळासाहेब थोरात

2014 सालापासून लोकशाहीची गळा घोटण्याचे काम सुरू असून आता ते परमोच्च बिंदूवर आले आहे. लोकसभा निवडणुका समोर आहेत, त्या दहशतमुक्त व भयमुक्त वातावरणात व्हाव्यात अशी अपेक्षा असताना आपल्या विरोधात (Lonavala) असलेल्या पक्षाचे खाते गोठवणे हा एक दहशतवाद निर्माण करण्याचा प्रकार असून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू असल्याचा संताप विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडला या हे दुःख – अमित देशमुख

अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला याचे दुःख आहे. त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत, ते कायम राहतील, राजकीय संबंध फक्त सत्ताधारी व विरोधक असे राहतील असे सांगितले. मी काँग्रेस पक्ष सोडणार ह्या सर्व मिडीयामधून पेरले जाणाऱ्या बातम्या आहेत. काल लातूर येथे पूर्व नियोजित कार्यक्रम असल्यामुळे मी विधिमंडळाच्या बैठकीला गैरहजर होतो. याबाबत पक्षाला कल्पना आहे. मीडियाने याचा गैरअर्थ काढू नये असे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.