Lonavala : उच्च शिक्षणामधील महाराष्ट्राचे स्थान अबाधित राहयला हवे – आनंद रायते

सिंहगड महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

एमपीसी न्यूज – उच्च शिक्षणामधील महाराष्ट्राचे स्थान अबाधित राखण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे,असे मत महाराष्ट्र शासनाचे सचिव आनंद रायते यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शासनाच्या प्रवेश नियामक प्राधिकरण (ऍडमिशन रेग्युलेटरी अथोरिटी- ए.आर. ए.) आणि सामायिक प्रवेश परीक्षा (कॉमन एंट्रन्स टेस्ट, सीइटी) कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया रूपरेषा ठरविण्यासाठी लोणावळ्यातील सिंहगड मह‍विद्यालयात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.

  • विद्यार्थी केंद्रित आणि पालकांना सोयीची अशा प्रकारची प्रवेश व्यवस्था आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून एक खिडकी योजनेप्रमाणे नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी बोलताना रायते यांनी व्यक्त केले.

कार्यशाळेत कल्पा-टेक पुणे, चे संचालक कमलाकर जोशी यांनी सेतू असिस्टड ऍडमिशन रजिस्ट्रेशन पोर्टल (एस. ए. ए.आर. ) प्रणालीची माहिती ऑडिओ-व्हिज्युअल मार्फत दिली.

  • कार्यशाळेसाठी माणिक गुरसाळ, शुल्क नियामक प्राधिकरणचे सचिव माणिक गुरसाळ महाराष्ट्र राज्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजीव शेटकर यांच्यासह उपसंचालक तंत्रशिक्षण संचलनालय महाराष्ट्राच्या गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर इत्यादी विभागातून 550 प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक सिंहगड मह‍विद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एम. एस. गायकवाड यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.