Lonavala News : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या बंगल्यावर ‘सीबीआय’चा छापा

एमपीसीन्यूज : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील एका रिसाॅर्टमधील बंगल्यावर आज सीबीआयच्या पथकाने छापा टाकला. अतिशय गोपनीय पद्धतीने ही कारवाई करण्यात आल्याने याची स्थानिक पोलीस प्रशासनाला देखील खबर लागली नाही.

_MPC_DIR_MPU_II

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी मागील काळात ईडीने प्रताप सरनाईक व त्यांच्या मुलाची चौकशी केली होती. मात्र नंतर ही कारवाई थंडावली होता. आता पुन्हा सीबीआयने अचानक हा छापा टाकल्याने त्यामधून काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरनाईक यांचा कुणेगाव परिसरातील डेल्ला रिसाॅर्टमध्ये बंगला आहे. त्याठिकाणी हा छापा टाकण्यात आला असून सरनाईक या बंगल्यात कधी आले होते, तसेच अन्य काही पुरावे मिळतात का, याचा तपास या पथकाकडून सुरू आहे. याकरिता रिसाॅर्टचे सिसीटिव्हि फुटेज देखील तपासले जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.