Pune Crime News : शेतजमीन आणि विहीर बळकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मंगलदास बांदल यांच्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शेतजमीन आणि विहीर बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मंगलदास बांदल आणि त्यांच्या भावाविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानदेव गुलाबराव तनपुरे (वय 68, सेवानिवृत्त पोलीस) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

मंगलदास विठ्ठलदास बांदल, बापूसाहेब विठ्ठलराव बांदल आणि अन्य एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सणसवाडी गावच्या हद्दीत फिर्यादीच्या मालकीची जमीन आहे. आरोपी मंगलदास बांदल आणि त्यांच्या भावाने फिर्यादी यांच्या शेतातून त्यांना न विचारता चार चाकी वाहने जातील असा रस्ता तयार केला. आणि त्यांच्या घरी तुमचे दररोज पाण्याची चोरी करत होते. फिर्यादी यांचा मुलगा कैलास तनपुरे यांनी बापूसाहेब बांदल यांना फोन करून आमच्या शेतातून तुमचे पाण्याचे टँकर नेऊ नका आमची शेती खराब होत आहे अशी विनंती केली. त्यावर आरोपीने टॅंकर तुमच्या शेतातून येणारच आणि विहिरीतून पाणी देखील नेणार, तुमच्यात दम असेल तर अडवून दाखवा असे म्हणत अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याची धमकी दिली.

दरम्यान या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी मंगलदास बांदल आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे शिक्रापूर पोलीस अधिक तपास करत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.