Lonavala : सिंहगड महाविद्यालयात शासनाचे सेतू सुविधा केंद्र सुरु

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता सिंहगड महाविद्यालयात शासनाचे सेतू सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे.

वैद्यकिय शिक्षण, तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, कला, कृषी, मत्स्य व दुग्ध शिक्षण या विभागार्तंगत असलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता घेण्यात येणार्‍या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन, समुपदेशन व त्याच्या मूळ कागदपत्राची पडताळणी करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने लोणावळ्याजवळील सिंहगड महाविद्यालयात सेतू केंद्र सुरु करण्याची मान्यता दिली आहे.

हे केंद्र मागील आठवड्यात सुरु झाले असून ग्रामीण भागातील तसेच परिसरातील विद्यार्थ्यांनी प्रवेश काळात होणारी तारांबळ व गैरसोय टाळण्याकरिता या सेतू सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संचालक डाॅ.एम.एस. गायकवाड व प्राचार्य डाॅ.एम.एस. रोहोकले यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.