Lonavala News : कोविडचा प्रतिबंध करण्याऐवजी सरकार कंगना प्रकरणात रंगलं – प्रवीण दरेकर

कोरोना महासर्वेक्षण अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी विरोधी पक्षनेते दरेकर लोणावळा शहरात आले होते.

एमपीसीन्यूज : कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत असताना तसेच हे संकट आता मोठ्या शहरासोबत लहान शहरात आणि ग्रामीण भागात पोचलं असताना, त्याकडे लक्ष देण्यापेक्षा सरकार मात्र कंगनामध्येच रंगलेलं दिसत आहे, अशी टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लोणावळ्यात केली.

कोरोना महासर्वेक्षण अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी विरोधी पक्षनेते दरेकर लोणावळा शहरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी दरेकर यांच्यासमोर शासनाकडून नगरपरिषदेस अजूनही कोणत्याही प्रकारची मदत प्राप्त झाली नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.

यावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाना राज्य शासनाने आर्थिक मदत दिली पाहिजे, असे आवाहन केले.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक देविदास कडू, ब्रिंदा गणात्रा, रचना सिनकर, मंदा सोनवणे, माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, भाजप शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल आदींसह मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.