Lumpy disease : ‘लंपी’ आजाराची खेड तालुक्यात एन्ट्री

एमपीसी न्यूज : ‘लंपी’ या विषाणुजन्य आजाराने खेड तालुक्यात शिरकाव केला आहे. करंजविहीरे ( ता. खेड ) येथील एका गुराचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते.(Lumpy disease) त्यात या गुराला  ‘लंपी’ या विषाणुजन्य आजाराची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील प्रशासन अलर्ट झाले असून तातडीने उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.

नैसर्गिक संकटाच्या समस्येच्या गर्तेत नेहमीच अडकून असलेला शेतकरी लंपीने आणखी अडचणीत आला आहे. शेतकरी व दुग्धव्यावसायिक आता जनावरांना वेगाने संसर्ग वाढत चाललेल्या ‘लंपी’ या विषाणुजन्य आजारामुळे चिंतेत आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर उपचारावर मोठा खर्च करावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटातही सापडला आहे.

Khed : इमारतीवरून उडी मारून तरुणाची आत्महत्या

चाकणचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक औताडे यांनी सांगितले कि, लंपी हा जनावरांना होणारा विषाणुजन्य त्वचारोग आहे. यामध्ये जनावरांच्या शरीरावर काळे फोड येऊन जखमा होतात. (Lumpy disease) आजार झाल्यानंतर जनावरांना ताप येणे, डोळे व नाकातून स्राव गळणे, अंगावर गाठी येणे,लाळ गळणे, पायांना सूज येणे, चारा न खाणे, दुभत्या जनावरांच्या दुधात घट होणे अशी लक्षणे दिसून येतात. खेड तालुक्यातील सर्व ग्रामपंचातीना या आजाराची गुरे आढळल्यास फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बाधित जनावरे निरोगी जनावरांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्याने,माशा,डास, गोचीड यांच्यामुळे, बाधित जनावरांच्या संपर्कातील वस्तू, बांधण्याचे ठिकाणी निरोगी जणावरांचा वावर यांमुळे(Lumpy disease) हा आजार पसरत असल्याचे देखील डॉ. औताडे यांनी सांगितले . लंपीचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन लसीकरण खेड तालुक्यात सुरु करण्यात आले  आहे.  पशुपालक शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.