Teacher’s Day : शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत ठेवावे – शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज – जागतीक पातळीवर भारतीय विद्यार्थी हे कौशल्यांच्या बाबतीत मागे आहेत. त्यामुळे शिक्षकांनी (Teacher’s Day) स्वतःला अद्ययावत ठेवावे, असे मत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी (दि.5) व्यक्त केले.
ते कमला एज्युकेशन सोसायटीचे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्, लायन्स क्लब ऑफ पीसीएमसी ॲण्ड मावळ, व्हीईएस जैन इंग्लिश स्कूल आणि श्री पार्श्व प्रज्ञालय ज्ञान संस्कार मंदिर या संस्थांनी आयोजित केलेल्या शिक्षक दिनाच्या (Teacher’s Day) सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम आकुर्डी येथे प्रतिभा महाविद्यालयात आयोजित केला होता.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन सदस्य राजेश पांडे, कमला एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष प्रतिभा शहा, सचिव डॉ. दीपक शहा, लायन्स क्लब 3234 डी – 2 प्रांतपाल डॉ. परमानंद शर्मा, उपप्रांतपाल सुनील चेकर, जैन इंग्लिश स्कूल विश्वस्त प्रकाश ओसवाल, कार्यक्रमाचे समन्वयक लायन दामाजी आसबे, अनिल झोपे, शशी कदम, प्रशांत कुलकर्णी, डॉ. राजेंद्र कांकरिया, भूपाली शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजेश पांडे यांनी आपल्या मनोगतातून, “भावी काळात शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र बदल होणार असून वैद्यकीय अन् अभियांत्रिकी यांसारख्या शाखांचे शिक्षण मातृभाषेतून देण्याचे धोरण राबविण्यात येणार आहे. या बदलांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करणे हे गुरुजनांचे आद्यकर्तव्य आहे!” असे विचार मांडले.
लायन प्रशांत शहा, नीलेश मेटे, अमृतराव काळोखे, अशोक लेंभे, वसंत गुजर, पवन कर्मा, प्रकाश मुटके, डॉ. सचिन बोरगावे, प्रमोद जाधव, प्रदीप कुलकर्णी, प्रमिला वाळुंज, डॉ. पुर्णिमा कदम, सरस सिन्हा, वनिता कुऱ्हाडे, सविता ट्राविस, अजित देशपांडे यांनी संयोजनात सहकार्य केले. सुवर्णा गोगटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. क्षितिजा गांधी यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.