PCMC News: नोकर भरती! 386 पदांसाठी तब्बल 69 हजार 32 अर्ज

एमपीसी न्यूज : पिंपरीचिंचवड महापालिकेतील विविध विभागातील आणि गटातील 386 पदांसाठीच्या सरळ सेवा भरतीसाठी तब्बल 69 हजार 32 अर्ज ऑनलाईन पद्धतीने आजपर्यंत प्राप्त झाले आहेत.(PCMC News) परीक्षा शुल्कासह उद्या (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज करायची अंतिम मुदत आहे. त्यामुळे उद्यापर्यंत आणखीन मोठ्या संख्येने अर्जा प्राप्त होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नोकर भरतीवरील निर्बंध उठविले आहेत. त्यानंतर प्रशासनाने भरतीचा धडाका लावला आहे. महापालिकेची वैद्यकीय विभागातील भरती प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात अडकली आहे. महापालिका सेवेतून दरमहा नियत वयोमानानुसार 20 ते 25 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. काही कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती घेत आहेत.(PCMC News) त्यामुळे महापालिकेत सुमारे पाच हजार पेक्षा पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेने सरळ सेवेने भरती प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे.

Whatsapp chatbot : पुणे महापालिकेच्या व्हॉट्सॲप चाटबोट द्वारे नागरिकांना मिळणार 24×7 प्रशासनाचा प्रतिसाद

विविध विभागातील ‘ब’ आणि ‘क’ गटातील 386 रिक्त पदांसाठी सरळ सेवेने भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये लिपिक-213, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)- 75, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक-41, कनिष्ठ अभियंता (विद्युत)-18, आरोग्य निरीक्षक-13, अतिरिक्त कायदा सल्लागार-1, विधी अधिकारी-1, उपमुख्य अग्शिमन अधिकारी-1, उद्यान निरीक्षक-4, हॉट्रीकल्चर सुपरवायझर-8 अशी विविध पदांसाठी महापालिकेने ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.

तब्बल 69 हजार 32 अर्ज आले आहेत. त्यात लिपिक पदासाठी 22 व कनिष्ठ अभियांत्रिकी पदासाठी 21 हजारांहून अधिक अर्ज आले आहेत.(PCMC News) 33 हजार उमेदवारांनी एक हजार रुपये परीक्षा शुल्क जमा केले आहे. परीक्षा शुल्कासह गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अर्ज करायची मुदत आहे. एक लाख अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे. खासगी एजन्सीमार्फत नोव्हेंबरमध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.