Pimpri Corona Update : शहरात आज 81 नवीन रुग्णांची नोंद; 56 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 81 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, (Pimpri Corona Update) कोरोनामुक्त झालेल्या 56 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 628 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.(Pimpri Corona Update) शहरातील 3 लाख 70 हजार 448 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 458 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 445 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

PCMC News: नोकर भरती! 386 पदांसाठी तब्बल 69 हजार 32 अर्ज

तर, 13 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 1 हजार 715 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 57 हजार 953 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.