Mahalunge : विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या कारची दुचाकीला धडक

एमपीसी न्यूज – विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या कारने (Mahalunge)दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील व्यक्ती गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी (दि. 30) रात्री आठ वाजता महाळुंगे येथे घडला.

अमोल भीमा पाडाळे (वय 38, रा. म्हाळुंगेगाव, ता. मुळशी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अतुल भीमा पाडाळे (वय 34) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 01/ईएन 1126 या कार चालक महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : भजनसम्राट अनुप जलोटा यांच्या भजनांनी जिंकली रसिकांची मने

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ (Mahalunge)अमोल पाडाळे हे त्यांच्या दुचाकीवरून म्हाळुंगे गावातील संभाजीनगर येथून जात होते.त्यावेळी त्यांच्या समोरून विरुद्ध दिशेने भरधाव वेगात एक कार आली. कारने अमोल यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये अमोल हे गंभीर जखमी झाले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.