Mahalunge : एका लाईन मध्ये येण्यास सांगितले म्हणून सुपरवायजरला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज- कंपनीमध्ये येताना एका लाईन मध्ये या (Mahalunge) असे सांगितले याचा रागातून तीन ते चार जणांनी सुपरवायजरला बेदम मारहाण केली. हा सारा प्रकार मंगळवारी (दि.9) महाळुंगे येथील वेरॅक इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये घडला.

याप्रकरणी धीरज प्रकाश पांढरे (वय 32, महाळुंगे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यामध्ये ओमप्रकाश धोंडीबा बोराडे (वय 19), आकाश रामसिंग डोंगरे (वय 24), राजू नानाभाऊ बोराडे (वय 31), किशोर रामेश्वर कांबळे (वय 23) सर्वजण राहणारे निघोजे खेड येथील आहेत.

Maharashtra : भारतीय संगीत क्षेत्रातील तेजस्वी प्रभा निमाली – एकनाथ शिंदे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वेरॅक कंपनीमध्ये सिक्युरिटी सुपरवायजर या पदावर काम (Mahalunge) करतात. त्यांनी कंपनीमध्ये येताना आरोपींना लाईन मध्ये या असे सांगितले. याचा राग येऊन ओमप्रकाशने त्याच्या इतर साथीदारांना गोळा करून फिर्यादी यांना शिवीगाळ करत हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.