Talegaon : तळेगाव दाभाडे येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथे राणा राजपूत समाज महाराणा प्रतिष्ठान तर्फे (Talegaon) दरवर्षी प्रमाणे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांची 483 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वर्षी या समाजाच्या जयंतीचे 35 वे वर्ष होते.

यावेळी कार्यक्रमात मयुर डाळवाले, शुभम डाळवाले, आकाश डाळवाले, भुषण राठोड, गोकुळ सानंदा, प्रशांत हिरवणे, केदार राणा(सितापुरे), अक्षय राणा, प्रसाद राणा, मंगेश डाळवाले, सागर वडसरिया, प्रमोद डाळवाले,योगेश सितापुरे आदी उपस्थित होते.

Pune : मोबाईल, दागिने चोरीनंतर आता पुण्यात चक्क चप्पल चोर

कार्यक्रमात महाराणा प्रताप सिंह यांच्या विचारांवर उजाळा टाकण्यात आला. पद्मभूषण डम्बे यानी महाराणा प्रताप यांच्याविषयी भाषण केले. तसेच समाजाच्या वतीने (Talegaon) या वेळेस जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. महाराणा प्रतापजी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांचा जयघोष करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अक्षय डाळवाले यानी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तळेगाव दाभाडे भाजपा शहराध्यक्ष रविंद्र माने तसेच बसंती रजपूत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.