Pune : मोबाईल, दागिने चोरीनंतर आता पुण्यात चक्क चप्पल चोर

एमपीसी न्यूज-तीन तरुणांनी दुकानाचे शटर (Pune ) उचकटून  30  ते 40  हजार रुपयांचे तब्बल 55 चप्पल आणि बूट जोड चोरट्यांनी  चोरून नेले. ही घटना पुण्यातील खडकी भागात घडली.

हरेश आहुजा यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली असून सागर चांदणे, आकाश कपूर, अरबाज शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे.खडकी पोलिस ठाण्यात या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Charholi : इथे क्रिकेट खेळलात तर हातपाय तोडेन म्हणत तरुणाला बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आहूजा यांचे खडकी बाजार भागात चपलेचे गोडाऊन आहे. शनिवारी गोडाऊन बंद केल्यानंतर रात्री या तीन तरुणांनी गोडाऊनचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि हाताला दिसेल आणि मिळतील तसे बूट आणि चप्पल असे एकूण 55 चप्पल आणि बूट चोरी करून पसार झाले. खडकी पोलिसांनी या आरोपींना अटक केली असून अशिक्षित असल्यामुळे उदरनिर्वाह तसेच दारू पिण्यासाठी ही चोरी  केली असल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले (Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.