Charholi : इथे क्रिकेट खेळलात तर हातपाय तोडेन म्हणत तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना अडवून त्यातील (Charholi) एकाला बेदम मारहाण केली. जखमी तरुणाने पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता फोन हिसकावून घेत ‘पोलिसांना सांगितले तर तुला कोयत्याने तोडतो’ अशी तरुणाला धमकी दिली. हा प्रकार रविवारी (दि. 21) सायंकाळी सव्वाचार वाजता चऱ्होली खुर्द येथे घडला.

अजय निळकंठ साबळे (वय 23, रा. चऱ्होली खुर्द, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषी उर्फ रवी अंकुश कांबळे, अथर्व वरणकर (रा. चऱ्होली खुर्द) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे मित्र क्रिकेट खेळत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी फिर्यादींना ‘इथे क्रिकेट खेळायचे नाही. इथे खेळला तर तुझे हात पाय मोडीन’ अशी धमकी दिली.

Chinchwad : कोट्यवधींच्या चोऱ्या; पण पोलिसांना गांभीर्यच नाही

फिर्यादीच्या हातातील बॅट आरोपींनी भिंतीवर आपटून फोडली. त्यानंतर काठीने (Charholi) मारून फिर्यादीस जखमी केले. फिर्यादी पोलिसांना फोन करून माहिती देत असताना आरोपींनी फिर्यादीचा 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. ‘पोलिसांना सांगितले तर तुला कोयत्याने तोडतो’ अशी धमकी देऊन आरोपी दुचाकीवरून शिवीगाळ करत निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.