Pune : पुणे महापालिकेवर 16 जून रोजी महाविकास आघाडीचा महामोर्चा

लाल महाल ते पुणे महापालिकेवर मोर्चा असणार

एमपीसी न्यूज : पुणे महापालिकेमध्ये भाजप सत्तेत होती. त्यावेळी चुकीच्या पध्दतीने काम केली. त्यानंतर आता आलेल्या शिंदे फडणवीस सरकार पुणेकर नागरिकांवर अन्याय करत आहे. त्या विरोधात 16 जून रोजी लाल महाल ते पुणे (Pune) महापालिकेवर महा मोर्चा काढला जाणार आहे.

Talegaon : तळेगाव दाभाडे येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी

हा निर्णय काँग्रेस भवन येथे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला.

या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असून त्यांच्याकडून वेळोवेळी पुणेकर नागरिकांवर अन्याय करण्याचा काम केले जात आहे. पुणे महापालिकेमध्ये भाजपची सत्ता होती.त्यावेळी शहराच्या दृष्टीने एक ही मोठा प्रकल्प आणता आला नाही.

तसेच नदी सुधार प्रकल्प हजार कोटीमध्ये केला जाणार अशी घोषणा करण्यात आली. मात्र त्याच काम कुठेच दिसत नाही.यासह अनेक प्रकल्प अद्याप ही प्रलंबित असून सध्या महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासकाच्या भूमिकेत असून त्यांच्या आदेशानुसार शहरामध्ये काम चालू आहेत.तसेच चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री पदाचा पदभार हाती घेतल्यापासुन शहराच्या हिताचा एक ही निर्णय घेतला नाही.

शहरात थोड्या प्रमाणात पाऊस झाल्यावर अनेक घरामध्ये पाणी गेले.आता तरी पाणी कपातीचा निर्णय घेतला. यासह अनेक समस्यांनी पुणेकर (Pune) नागरिक त्रस्त आहे.पालकमंत्री आणि महापालिका आयुक्त या दोघांमध्ये योग्य प्रकारे समन्वय नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे मागील सात वर्षाच्या कामांची श्वेतपत्रिका काढली पाहिजे.

तसेच भाजपचा यातून खरा चेहरा समोर आला पाहिजे. या मागणीसाठी 16 जून रोजी लाल महाल ते पुणे महापालिकेवर महाविकास आघाडीचा महामोर्चा काढला जाणार असल्याचे आजच्या बैठकीत एकमताने ठरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पुण्यात 25 ते 30 जून दरम्यान वज्रमूठ सभेच नियोजन

राज्यभरात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा होत आहे. त्या सभांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून पुण्यात 25 ते 30 जून दरम्यान वज्रमूठ सभेच नियोजन केले जाणार आहे.या सभेला देखील पुणेकर (Pune) नागरिक चांगला प्रतिसाद देतील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.