Pune : भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या अभ्यासक्रमांची घोषणा 

एमपीसी न्यूज – भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाच्या (Pune) न्यू लॉ कॉलेजने शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे. या अभ्यासक्रमांची माहिती भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ उज्वला बेंडाळे यांनी दिली. बीबीए, बी ए (लेजिस्लेटिव्ह लॉ),एल एल बी साठी प्रवेश परीक्षा 17 जून रोजी आहे. त्यासाठी 6 जून ही नाव नोंदणीची अंतिम मुदत आहे.  

पुणे महापालिकेवर 16 जून रोजी महाविकास आघाडीचा महामोर्चा

एल एल एम साठी 16 जुलै रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे. एल एल एम साठी 8 जुलै ही नाव नोंदणीची मुदत आहे. अधिक माहिती 9359417269 या दूरध्वनी क्रमांकावर तसेच [email protected] या ठिकाणी ईमेल करून मिळू शकेल.

या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी एम एच सीईटी परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. भारती अभिमत विद्यापीठाची सीईटी आवश्यक आहे .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.