Maharashtra : कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार; उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ

एमपीसी न्यूज – कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्यासाठी(Maharashtra) उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विदर्भ, मराठवाड्यातील प्रलंबित कृषी पंप वीज जोडणी यातून पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

उच्च दाब वितरण प्रणाली योजना 2018 ते 2020 या वर्षात पूर्ण( Maharashtra)करावयाची होती. परंतु मुसळधार पाऊस आणि शेतात उभी पिके असल्याने ट्रान्सफॉर्मर्स (रोहित्र) उभारणीत अडथळा निर्माण झाला. त्यानांतर आलेल्या कोविडमुळे देखील या योजनेची प्रगती होऊ शकलेली नाही. या उपकेंद्रांच्या कामांसाठी लागणारा वेळ 15 ते 18 महिन्यांचा होता.

Bavdhan : दुचाकी पार्क करून चारचाकी पळवली

त्यामुळे या योजनेचा मूळ खर्च 5 हजार 48 कोटी 13लाख इतक्यावरून 4 हजार 734 कोटी 61 लाख इतका सुधारित करण्यात आला आणि योजनेचा कालावधी मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आला होता. त्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात अली आहे. सध्या 1 लाख 38 हजार 787 वीज जोडण्यांपैकी 23 कृषी पंप वीज जोडण्या आणि 93 उपकेंद्रांपैकी 4 उपकेंद्रांची कामे प्रलंबित आहेत. सध्या पावसाळ्यामुळे या उपकेंद्रांची कामे पूर्ण करण्याकरिता योजनेचा कालावधी मार्च 2024पर्यंत वाढविण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.